PUNE DARSHAN

  




   Note:- After booking the Pune Darshan service online and offline, if less than 12 passengers are                        available, the Pune Darshan service for that day will be canceled and refund will be given as per the Corporation's procedure. Passengers are kindly requested to take note of this and cooperate with the Transport Corporation.

  नोंद:- पुणे दर्शन सेवा ऑनलाइन आणि ऑफलाइन बुक केल्यानंतर, १२ पेक्षा कमी प्रवासी उपलब्ध झाल्यास,    त्या दिवसाची पुणे दर्शन सेवा रद्द केली जाईल आणि महामंडळाच्या कार्यपद्धतीनुसार परतावा दिला                  जाईल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घेऊन परिवहन महामंडळास सहकार्य करावे ही नम्र विनंती.

                   


Every year a large number of travelers come to visit the famous as well as historical places in Pune. PMPML has launched special Pune Darshan buses to enable passengers to enjoy their visit to Pune and also to boost Pune tourism. Daily 2 A. C. Buses 25 km. I. They travel to 18 places. A tourist guide is provided along with it, which guides the passengers systematically about all the places.
  Pune Darshan Tour starts daily at 9.00 AM and ends at 6.00 PM. One day travel cost is Rs.500 per person. Passengers can book tickets both online and offline. For online booking www.pmpml.geodirect.in and redbus.in Varun till 12 pm. Also can do offline Pune station or Deccan till 8.00 am.
 Passengers need to reach on time as the bus starts its journey on time. Passenger destinations are fixed, passengers should not be asked to change their route at their convenience. If the bus misses due to some reason, you can call pmpml's call center and check the location of the bus and start the journey. contact:- 020-6646 6646 mail-id - feedback@geodirect.in
Tourist places that can be seen in Pune Darshan are as follows. 1. Kesariwada 2. Shaniwarwara 3. Lal Mahal 4. Srimanta Dagdusheth Ganapati Temple exterior view 5. Aga Khan Palace 6. Tribal Art Museum 7. Yudh Bhoomi/National War Memorial Sadan Command Area 8. Shinde Chhatri 9. Rajiv Gandhi Zoological Museum 10. Sarasbag Ganapati Temple 11. Mahalakshmi Temple Exterior View 12. Pu. L. Deshpande Park 13. Kelkar Museum 14. Dr. Babasaheb Ambedkar Museum 15. Chatushringi Mata Mandir and 16. ISKCON TEMPLE KONDHWA ROAD.


पुण्यातील प्रसिद्ध तसेच ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी मोठ्या संखेने प्रवासी येत असतात. प्रवाशांना पुणे भेटीचा आनंद घेता येण्यासाठी तसेच पुणे टुरिजम वाढवण्यासाठी पीएमपीएमएल ने खास पुणे दर्शन बसेस सुरू केल्या आहेत. रोज 2 A. C. बसेस 25 कि. मी. चा प्रवास करून 18 स्थळांना भेट देतात. सोबत एक टुरिस्ट गाइड ही दिला जातो, जो प्रवाशांना सर्व स्थळांबद्दल व्यवस्थीत मार्गदर्शन करत असतो. 
पुणे दर्शन टूर रोज सकाळी 9.00 वाजता सुरू होते आणि संध्याकाळी 6.00 वाजता संपते. एका दिवसाचा प्रवास खर्च प्रती व्यक्ति 500 रुपये आहे. प्रवासी टिकिट ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने बोक करू शकता. ऑनलाइन बूकिंग साठी www.pmpml.geodirect.in तसेच redbus.in वरुण रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता. तसेच ऑफलाइन पुणे स्टेशन किंवा डेक्कन ला सकाळी 8.00 वाजेपर्यंत करू शकता. 
बस वेळेत प्रवासाला सुरुवात करत असल्याने प्रवाशांनी वेळेत पोहचणे गरजेचे आहे. प्रवाशी स्थळे ही ठरलेली आहेत, प्रवाशी त्यांच्या सोयीने त्यांच्या सोयीने मार्गात बदल करण्यास सांगू नये. 
काही कारणास्तव जर बस चुकली तर pmpml च्या call सेंटर ला फोन करून बस चे location बघून प्रवासाला सुरुवात करू शकतात. contact:- 020-6646 6646  mail-id - feedback@geodirect.in

पुणे दर्शन मध्ये पाहता येणारी पर्यटन स्थळे खालील प्रमाणे. १. केसरीवाडा २. शनिवारवाडा ३. लालमहाल ४. श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिर बाह्यदर्शन ५. आगाखान पॅलेस ६. आदिवासी वस्तु संग्रहालय ७. युध्द भूमी/नॅशनल वॉर मेमोरीएल सदन कमांड एरिया ८. शिंदे छत्री ९. राजीव गांधी प्राणी संग्रहालय १०. सारसबाग गणपती मंदिर ११. महालक्ष्मी मंदिर बाह्य दर्शन १२. पु. ल. देशपांडे उद्यान १३. केळकर संग्रहालय १४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय १५. चतुश्रृंगी माता मंदिर व १६. इस्कॉन मंदिर कोंढवा रोड.